कुडाळमध्ये २९ ला नृत्य सन्मान सोहळा

चिमणी पाखरं डान्स ऍकॅडमीच आयोजन
नृत्य कलाकार, निवेदक, कोरिओग्राफर यांचा होणार सन्मान
रवी कुडाळकर आणि सुनील भोगटे यांची पत्रकार परिषद
निलेश जोशी । कुडाळ : कुडाळच्या चिमणी पाखरं डान्स अकॅडेमीच्या वतीने नृत्य क्षेत्रातला पुरस्कार वितरणाचा नृत्य सन्मान सोहळा रंगणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातला अशा प्रकारचा हा पहिलाच अवॉर्ड शो असून कुडाळच्या मराठा समाज हॉल मध्ये शुक्रवार दिनांक २९ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा सोहळा होणार आहे. सिंधुदुर्गातले नृत्य कलाकार, नृत्य दिग्दर्शक, निवेदक, रंगमंच व्यवस्था प्रमुख, नृत्य कार्यक्रम आयोजक या सर्वांचा त्यांच्या नृत्य क्षेत्रातल्या सेवेसाठी नृत्य सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे. चिमणी पाखरं डान्स ऍकॅडमीचे अध्यक्ष रवी कुडाळकर आणि सल्लागार सुनील भोगटे यांनी हि आज पत्रकार परिषदेत हि माहिती दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक कलाकार नृत्य क्षेत्रात काम करत आहेत. गेली अनेक वर्ष हे कलाकार नृत्य क्षेत्राची सेवा करत आहेत. त्यात अनेक ज्येष्ठ कलाकार देखील आहेत. अशा कलाकारांचा सन्मान करावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा नृत्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असलयाचे रवी कुडाळकर आणि सुनील भोगटे यांनी सांगितले. यासाठी चिमणी पाखर डान्स अकादमी या शासनमान्य संस्थेच्या वतीने नृत्य कलाकारांना आवाहन आवाहन करण्यात आले होते. त्यातून सुमारे ६०० नृत्य कलाकार, कोरिओग्राफर, नृत्य कार्यक्रमाचे निवेदक, नृत्य कार्यक्रम आयोजक, बॅकस्टेज आर्टिस्ट अशा सर्वानी संपर्क साधून आपली माहिती दिली. या सर्वांचा प्रामुख्याने गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध निवेदक आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र ऋषी देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अगदी मोठया कार्यक्रमाच्या धर्तीवर हा नृत्य संक्रमण सोहळा होणार आहे. पुरस्कार वितरणाच्या सोबतच नृत्य, स्किट, मिमिक्री अशाप्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रमयावेळी सादर केले जाणार आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा दरवर्षी होणार आहे. पुढच्या वर्षी कार्यक्रमाचे स्वरूप वेगळे असेल असे रवी कुडाळकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन चिमणी पाखर डान्स अकादमीच्या वतीने रवी कुडाळकर आणि सुनील भोगटे यांनी यावेळी केले आहे.
निलेश जोशी,कोकण नाऊ, कुडाळ.