ओरोस मुख्यालय येथे जादूटोणा विरोधी कायद्याचे व्याख्यान संपन्न

ओरोस – नुकतेच जिल्हा परिषद प्राथ शाळा ओरोस मुख्यालय ओरोस ता . कुडाळ येथे महाराष्ट्र शासनाची जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जादूटोणा विरोधी कायद्याचे प्रात्यक्षिकासह व्याख्यान अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांचे संपन्न झाले . यावेळी त्यांच्या समवेत मुख्याध्यापक संतोष तेरवणकर , शाळा व्यवस्थापन अध्यक्ष हार्दिक शिंगले , जिल्हा सहसचिव संजय खोटलेकर , जिल्हा सदस्य नामदेव मठकर व सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी
विजय चौकेकर यांनी हातचलाखीची आणि दोन रासायनिक संयुगांची छोटी छोटी प्रात्यक्षिके मुलांना करून दाखविली .यामध्ये पाण्याने दिवा पेटविणे , गड्यात भूत उतरविणे , भूताची प्रतिमा कागदावर उमठविणे , पेटता कापूर खाऊन दाखविणे , जीभेतून तार आरपार काढून दाखविणे , नारळातून चिंद्या . काच ,खिळे , फुले , मंगळसूत्र इ. काढून दाखविणे , मंत्राने अग्नी पेटविणे , मंत्र शक्तीने अगरबत्तीची दिशा बदलविणे , रिकाम्या हातातून विभूती , सोन्याची चैन , अंगठी काढून दाखविणे आदी प्रात्यक्षिके करून दाखविले . या जगात भूत , आत्मा अस्तित्वात नाही तसेच कोणाचाही अंगामध्ये देव किंवा देवी येऊ शकत नाही . तसेच कोणामधेही भविष्य पाहण्याची , आजार बरे करण्याची दैवी शक्ती नसते हे संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम संत गाडगेबाबा यांच्या अभंगातून व महामानवांच्या कार्यातून समजावून दिले .
यावेळी शाळेतील शिक्षिका सदिच्छा कसालकर , रिधिमा परब , राजलक्ष्मी मोरे , पदवीधर शिक्षिका सुजाता जाधव , स्वयंसेविका शुभांगी शिंगाडे , प्रणाली केसरकर आदी उपस्थित होते . यावेळी विजय चौकेकर यांनी कोणामध्येही करणी करणे , भानामती करणे , मुठ मारणे , आजार बरे करणे , जमिनीखालील खजिना ओळखणे , रिकाम्या हातामधून दैवी शक्तीने वस्तू निर्माण करणे या साठी कोणतीही दैवी शक्ती नसते. केवळ हातचलाखी असते . सर्वांनी वैज्ञानिक सत्य जाणून घेऊया . आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना जादूटोणा करून फसविणाऱ्या भोंदू लोकांपासून सावध करूया आणि आपले जीवन समृद्ध करूया असे आवाहन मुलांना व शिक्षकांना केले . यावेळी शाळेतील एकशे चाळीस मुलांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय खोटलेकर सरांनी केले तर सुजाता जाधव बाईनी आभार मानले .

error: Content is protected !!