पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर हा व्हाईस ऑफ मीडियाचा उपक्रम स्तुत्य – जिल्हाधिकारी

पत्रकारांच्या आरोग्यशिबिराला उत्तम प्रतिसाद

प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : विकासाच्या प्रक्रियेत सतत समाजाभमुख कार्य करणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य तपासणी कार्यक्रम हा स्तुत्य उपक्रम असून पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले.  सिंधुदुर्गनगरी येथे व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग यांच्यावतीने सोमवारी जिल्हा रुग्णालय, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी तावडे बोलत होते. 
      या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि आद्य पत्रकार  बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोला पुष्पहार घालून करण्यात आले.  यावेळी व्हाईस मीडिया संस्थापकीय अध्यक्ष संदीप काळे विभागीय अध्यक्ष अरुण ठोंबरे, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मनोज जोशी, व्हॉइस मीडिया सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष परेश राऊत, कार्याध्यक्ष समीर महाडेश्वर, राकेश कातकर, आदित्य भानुशाली, दीपेश लाड, सिद्धेश दाभोलकर, हर्षल ढेकणे, आनंद खोत आदींसह पत्रकार, वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, आयटीआय विद्यार्थी उपस्थित होते.
     यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले, व्हाईस मीडिया संस्थेच्या माध्यमातून पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य शिबिर आयोजित केले आहे.  पत्रकार हा विकासाचा चौथा स्तंभ असून विकास प्रक्रियेत महत्त्वाचा सहभाग असतो.  अनेक उपक्रमांसाठी धडपडणाऱ्या पत्रकारांना अशा प्रकारचे आरोग्य शिबिर घेणे आवश्यक आहे.  त्यांच्या कुटुंबाची आणि आरोग्याची जबाबदारी घेण्यासाठी व्हॉइस मीडिया संस्थेने जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले हे शिबिर असे उपक्रम सातत्याने व्हावेत.  हा शुद्ध उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
      यावेळी संस्थापकीय अध्यक्ष संदीप काळे म्हणाले, व्हाईस मीडिया संस्था जगभरात ४२ देशात कार्यरत असून देशभरात आणि महाराष्ट्र राज्यात जिल्हाजिल्ह्यात असे व्हॉइस मीडिया संस्थेच्या माध्यमातून उपक्रम सुरू आहेत.  महाराष्ट्र राज्यात आजचा हा सिंधुदुर्ग जिल्हा शेवटचा जिल्हा असून पत्रकारांच्या आरोग्याच्या बरोबर आयुष्यमान कार्ड व त्यांच्या उपचारासाठी ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मानाच्या दृष्टीने या संस्थेमार्फत उपक्रम सुरू असतात.  टप्प्या टप्प्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रात असे उपक्रम सातत्याने होतील.  जिल्ह्यात, तालुक्यात आणि शहरातही यापुढे उपक्रम घेऊन ही संघटना अधिक जोपासण्याच्या दृष्टीने आम्ही काम करू. 
      यावेळी जिल्हाध्यक्ष परेश राऊत यांनी आपले विचार व्यक्त करताना पत्रकार क्षेत्रात गेले अनेक वर्षे आपण कार्यरत असून व्हाईस मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी संघटना संरक्षण हक्क या दृष्टीने ही संस्था कार्य करत आहे.  यापुढे असे चांगले उपक्रम होत राहतील.  जेणेकरून जिल्ह्यातील पत्रकारांच्या आरोग्या बरोबर विविध सोयी सुविधांसाठी कार्यक्रम राबविले जातील.  आरोग्य संस्थेचे दिनेश लाड म्हणाले, पत्रकार यांच्या दृष्टीने हा आरोग्य शिबिर उपक्रम महत्त्वाचा असून यापुढे असे आरोग्य शिबिर आणि आरोग्य विषयक कार्यक्रम राबविले जातील.  कोकण विभागीय अध्यक्ष अरुण ठोंबरे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
      यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मिलिंद जोशी यांनी आरोग्य विषयक उपक्रमाच्या दृष्टीने माहिती देत यापुढे वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून सतत सहकार्य केले जाईल असे सांगितले.  त्यानंतर जिल्ह्यातील पत्रकार वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि आयटीआय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तसेच आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आले,     यावेळी व्हाईस ऑफ मीडिया जिल्हाअध्यक्ष परेश राऊत,कार्याध्यक्ष समीर महाडेश्वर, राजेश नाईक, डॉ बी एन खरात, विष्णू चव्हाण, संजय पिळणकर, शैलेश मयेकर,विवेक परब,नागेश दुखडे,विष्णू धावडे, आनंद धोंड, जिल्हा उपाध्यक्ष भूषण सावंत, आनंद  कांडरकर, विद्या बांदेकर, नयनेश गावडे, प्रथमेश गवस, संदिप गवस, वैभव ओवुळकर, संजय वालावलकर आदि पत्रकार उपस्थित होते.  प्रारंभी विभागीय अध्यक्ष अरुण ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले.  तर सूत्रसंचालन पांडुरंग कोरणे यांनी केले आभार प्रदर्शन संजय पिळणकर यांनी केले. 

प्रतिनिधी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

error: Content is protected !!