पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी रिमेश चव्हाण निर्दोष

कणकवलीत पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी होता गुन्हा दाखल
संशयित आरोपीच्या वतीने ऍड. विरेश नाईक, सिद्धेश शेट्ये यांच्यासह अन्य सहकारी वकिलांचा युक्तिवाद
कणकवली पोलीस स्टेशन जवळील पेट्रोल पंपा जवळ पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी संशयित आरोपी रिमेश अशोक चव्हाण याची पुराव्या आभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने ऍड. वीरेश नाईक, ऍड. सिद्धेश शेट्ये, ऍड. देवेश देसाई, ऍड. विष्णू सावंत यांनी काम पाहिले. याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल झुजे फर्नांडीस यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार संशयीत आरोपीच्या विरोधात भादवी कलम 353, 332, 504, 506, 118, 269, 270 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. कणकवली पोलीस स्टेशन नजीकच्या पेट्रोल पंपाजवळ रस्त्याने जाणाऱ्या एका एलपी ट्रक त्यासमोर लाल रंगाची दुचाकी लावून ट्रक चालकाबरोबर रिमेश चव्हाण हा त्याला शिवीगाळ करत असल्याची बाब निदर्शनास येतात झुजे फर्नांडिस यांनी त्याला विचारणा केली. त्यावर संशयित आरोपी रिमेश याने तुम्हाला वाळूच्या आमच्याच गाड्या दिसतात का इतर दिसत नाहीत असे विचारत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी रिमेश यांने फिर्यादी पोलीस झुजे फर्नांडीस यांच्या हाताला धरून दुखापत केली. या प्रकरणी संशयिताच्या विरोधात 7 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयात केलेल्या युक्तिवादात पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
दिगंबर वालावलकर/ कणकवली