कणकवली तालुका वारकरी संप्रदाय, कणकवली अध्यक्ष पदी ह.भ.प.चंद्रकांत परब तर सचिव पदी प्रा.श्री शामसुंदर राणे

नवीन कार्यकारीणीची करण्यात आली निवड
कणकवली– सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग संलग्न कणकवली तालुका वारकरी संप्रदाय, कणकवली ची सभा नुकतीच कणकवली येथे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. त्यावेळी तालुक्याच्या नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारणी -अध्यक्ष-ह.भ.प. चंद्रकांत परब, उपाध्यक्ष-ह.भ.प तानाजी रासम,सचिव-प्रा.शामसुंदर राणे, खजिनदार-श्री.गणपत घाडीगांवकर तर सदस्य म्हणून ह.भ.प. जनार्दन डोबकर,ह.भ.प.अच्युत घाडीगांवकर,ह.भ.प.प्रकाश सावंत,ह.भ.प.पांडुरंग मेस्त्री,ह.भ.प.विजय सुतार,ह.भ.प.मारुती मेस्त्री,ह.भ.प.मधुकर गावडे,श्री.सचिन ठाकूर,श्री.प्रदीप मोडक,ह.भ.प.राजेंद्र गावकर,ह.भ.प.अनिल घाडीगांवकर,ह.भ.प.योगेश आर्डेकर,श्री.अनंत गोळवनकर यांची नेमणूक करण्यात आली.
यावेळी जिल्हा सचिव श्री.राजू राणे,गोपाळ सावंत,शंतनू गावकर, लक्ष्मण गावडे,मनोहर घाडीगांवकर, रवींद्रनाथ गावकर,गजानन राणे,प्रभाकर राणे,संभाजी घाडीगांवकर, विक्रम राणे,तसेच नूतन कार्यकारणीसह वारकरी उपस्थित होते.नूतन कार्यकारणीचे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
कणकवली प्रतिनिधी