कुडाळ मालवण मतदार संघ राज्यात एक नंबर बनवण्यासाठी प्रयत्नशील : निलेश राणे

आचरा पिरावाडी येथील विकासकामांचे भाजप नेते निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन

राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर गतिमान विकास हेच धोरण अवलंबले जात आहे. कुडाळ मालवण मतदारसंघाचा विचार करता मागच्या ९ वर्षात आला नव्हता एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. ६५७ कोटीचा विकास निधी या मतदारसंघातील विकास कामांना प्राप्त झाला आहे. ही सुरवात आहेत. अजूनही भरपूर विकास कामे शिल्लक आहेत. याबाबत पाठपुरावा सुरू असून राज्यात कुडाळ मालवण मतदार संघ विकसकामात एक नंबर बनविण्यासाठी आपल्या सर्वांच्या सोबतीने प्रयत्नाशील असल्याचे भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख खासदार निलेश राणे यांनी आचरा येथे सांगितले.

आचरा गाऊडवाडी पिरावाडीला जोडणारया अंदाजित ८ कोटी ८६ लाख विकासनिधीतील उंच पातळीच्या पुलाच्या कामाचा भूमिपूजन शुभारंभ गाउडवाडी येथे निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, राजन गांवकर, उपसरपंच संतोष मिराशी,माजी सभापती निलिमा सावंत, राजन पांगे, डॉ प्रमोद कोळंबकर, जयप्रकाश परूळेकर ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर,पंकज आचरेकर,चंदू कदम,गांवकर, तसेच अन्य ग्रामपंचायत सदस्य, महेश मांजरेकर,दिपक सुर्वे,संतोष गावकर, देवेंद्र हडकर, बाबू कदम, मनोज हडकर, यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले शिंदे फडणवीस,अजित पवार सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. हे विकासाचे सरकार आहे. हा संदेश गावागावात पोहोचवला पाहिजे. असेही राणे यांनी सांगितले.

आचरा | अर्जुन बापर्डेकर :

error: Content is protected !!