माई हुंडाईच्या कणकवली ब्रांचचा पहिला वर्धापन दिन उत्साहात

विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्राहकांनी दिल्या शुभेच्छा
कणकवली : माई हुंडाईच्या कणकवली ब्रांचचा पहिला वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कणकवली ब्रांचमध्ये पूजेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्राहकांकडून तसेच कणकवलीतील बँकांच्या अधिकारी वर्गाने उपस्थित राहून माई हुंडाईला विशेष शुभेच्छा दिल्या.
यावेळी वागदे सरपंच संदीप सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्या सावी लोके, वाघेरी सरपंच अनुजा राणे यांनी कणकवली ब्रांचला भेट देवून शुभेच्छा दिल्या. यावेळी माई हुंडाईकडून सर्व सरपंच तसेच ग्राहकांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला. यावेळी माई हुंडाईचे ग्राहक, मुख्य व्यवस्थापक राहुल घोडगलकर, सर्व्हिस मॅनेजर महेश गेटजी, एचआर विभागप्रमुख उमेश पाटील, रत्नागिरी बिझनेस हेड दीपक कराळे, कुडाळ ब्रांच मॅनेजर भालचंद्र जोशी, स्पेअर डिपार्टमेंट हेड प्रभू, कणकवली तसेच कुडाळ ब्रांचचे कर्मचारी आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कणकवली