“रोटरी क्लब तर्फे आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मध्ये “कळी उमलताना ” या विषयावर मार्गदर्शन

कणकवली/मयुर ठाकूर

ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे आणि रोटरी क्लब कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने एचएचएम अंतर्गत “कळी उमलताना” अस्मिता प्रोजेक्ट उपक्रम नुकताच संपन्न झाला .
या अंतर्गत रोटरीयन डॉ.अश्विनी नवरे मॅडम यांनी प्रशालेतील सहावी, सातवी ,आठवी ,व अकरावी च्या मुलींना कळी उमलतानाचे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे अस्मिता पुस्तक व सॅनिटरी पॅडचे वितरण या मुलींना करण्यात आले.
मुलींना मोबाईलचा अतिवापर टाळावा, मोबाईलचे दुष्परिणाम व भविष्यात काय करावे यासाठी मार्गदर्शन या कार्यक्रमात करण्यात आले
सर्वप्रथम रोटरी क्लब कणकवली सेंट्रलच्या वतीने आयडियल इंग्लिश स्कूल ला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई यांना पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
रोटरी क्लब कणकवलीच्या सर्व दानशूर रोटरीयन्स तर्फे शाळेतील व्यवस्थापनाला नवीन सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन प्रदान करण्यात आली या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब कणकवली सेंट्रल चे अध्यक्ष श्री.शंकर उर्फ रवी परब मेडिकल कॅम्प डीस्ट्रिक सेक्रेटरी आणि ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल, रोटरीयन्स श्री लिमये सर,रोटरीयन उमा परब मॅडम, रोटरीयन मेघा गांगण मॅडम, कांबळी मॅडम,सौ काळसेकर मॅडम, आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!