कलमठ बाजारपेठ शाळेचा आमदार वैभव नाईक यांनी केला गौरव

जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल भेट देत शाळेचे केले कौतुक

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

जि. प. शाळा कलमठ बाजारपेठ क्र.१ या शाळेने “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्या निमत्ताने आज कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक आणि युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी शाळेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच या शाळेच्या शिक्षकांबद्दल गौरवोद्गार काढले.आमदार वैभव नाईक यांनी कलमठ बाजारपेठ शाळा क्र.१ मुख्याध्यापक मधुरा सावंत,
प्रमोद पवार, प्रदीप मांजरेकर, विद्या लोकरे, इंदू डगरे,
शाळा व्यवस्थापन समिती चे अमोल कोरगांवकर,नंदकुमार हजारे यांचे कौतुक करत शाळेची पाहणी केली. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्योजक रामदास विखाळे, किरण हुण्णरे
माजी सरपंच निसार शेख, विलास गुडेकर, ग्रामपंचायत सदस्य धीरज श्रीधर मेस्त्री,
सचिन खोचरे,अर्चना कोरगांवकर, इम्तियाज फकीर,
सुशील कोरगांवकर, राजू कोरगांवकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!