मंगेश गुरव यांची शिवसेना कणकवली विधानसभा प्रवक्तेपदी नियुक्ती

खारेपाटण येथील शिवसेना पक्षाचे व सध्या कणकवली उपतालुका प्रमुख या पदावर कार्यरत असलेले मंगेश गुरव यांची नुकतीच शिवसेनेच्या कणकवली विधानसभा प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली.मंगेश गुरव यांना मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशनाने विधानसभा प्रवक्ता पदी नियुक्त करत असलेल्या आशयाचे नियुक्ती पत्र मा.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या हस्ते मंगेश गुरव यांना देण्यात आले.मंगेश गुरव हे अतिशय कार्यतत्पर असे व्यक्तिमत्व असून खारेपाटण ग्रामपंचायत निवडणुकीत खारेपाटण सरपंच निवडून आणण्यात मंगेश गुरव यांनी किंगमेकर ची भूमिका बजावली होती. तसेच शिंदे गठात (शिवसेना पक्ष )प्रवेश केल्या नंतर खारेपाटण विभागात शिवसेना पक्ष वाढी करता ते सातत्याने प्रयत्न करताना दिसतात. त्याच्या नेतृवाने खारेपाटण सरपंच सह ३ सदस्य निवडून आणण्यात देखील त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी शिवसेना पक्षात उप तालुका प्रमुख पदी काम करत असताना सुद्धा विविध सामाजिक,शैक्षणिक, उपक्रम राबवून समाजाशी असलेली बांधिलकी आपुलकी मंगेश गुरव यांनी जोपासली आहे.
त्याच्या या विधानसभा प्रवक्ता या निवडीबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात येतं आहे.
आपल्या या निवडीबद्दल मंगेश गुरव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मार्गदर्शक -किरण (भैया )सामंत,रवींद्र फाटक -लोकसभा संपर्क प्रमुख,शिक्षण मंत्री दीपक केसरकर
यांच्या सह जिल्हाप्रमुख संजय आंग्रे संदेश पटेल यांचे आभार मानले आहेत.यापुढे ही पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्याच बरोबर लोकसभा सह विधनसा सभा निवडणुकीत पक्षाची बाजू भक्कम पणे मांडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे मंगेश गुरव यांनी सांगितले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण