भाषा समृद्ध करण्यासाठी संस्कृती टिकवणे गरजेचं – प्रा.डी.पी तानवडे.
मराठी भाषा गौरव दिन आयडियल प्रशालेत मोठ्या उत्साहात साजरा.
कणकवली/मयुर ठाकूर.
मातृभाषेचा गौरव म्हणून आणि कुसुमाग्रज यांना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’म्हणुन सर्वत्र साजरा करण्यात येतो.ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल प्रशालेत मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुलांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न केले.
प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ विद्याधर तायशेटे तसेच कार्याध्यक्ष बुलंद पटेल आणि संस्थेचे सल्लागार डी पी तानवडे यांनी मनोगत व्यक्त केले.
मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी संस्कृती टिकवणे गरजेचे आहॆ. संस्कृतीचे जतन झाले की मराठी भाषेचा सुगंध कायमच दरवळवत राहील अश्या भावना यावेळी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे सल्लागार डी पी तानवडे यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रम प्रसंगीं संस्थेचे अध्यक्ष डॉ विद्याधर तायशेटे, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, मुख्याध्यापिका अर्चना देसाई, प्रसिद्ध कवी श्री.गोसावी तसेच प्रशालेचे शिक्षक,विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते