असलदे ते कोळोशी स्वच्छता मोहीम : गाडगेबाबा जयंतीचे औचित्य


सिंधुदुर्ग : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशनच्या दीविजा वृद्धाश्रम, कोळोशी येथील शिवप्रतिष्ठान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी असलदे ते कोळोशी बस स्थानक पर्यंतचा रस्ताबाजुची स्वच्छता करण्यात आली.

यामध्ये दीविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबा, कर्मचारी वर्ग व शिवप्रतिष्ठान कोळोशी मंडळ चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वच्छता मोहीम दिविजा वृद्धाश्रम असलदे ते कोळोशी बाजारपेठ पर्यंत जाणारा मार्ग परिसरात साफ सफाई करण्यात आली. तसेच, स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे व माझा गाव स्वच्छ गाव अशा घोषणा देत समाजाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. स्वस्तिक फाऊंडेशनचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम कार्यक्रम करण्यात आला.

समाजातील लोकांना स्वच्छतेचे महत्व कळावे या उद्देशाने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबा व कर्मचारी व शिवप्रतिष्ठान कोळोशी मंडळ यांच्या सहकार्यामुळे परिसरातील प्लॅस्टिक कचरा व प्लॅस्टिक बॉटल उचलून या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली गेली. या कार्यक्रमासाठी दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबा व कर्मचारी वर्ग तसेच शिवप्रतिष्ठान कोळोशी मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!