खासदार विनायक राऊत यांच्या विजयाची काळजी भाजपा जिल्हाध्यक्षांना नको

शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांचा टोला
वैभव नाईक, भास्कर जाधव हे दोन वाघ भाजपला कोकणात रोखण्यासाठी पुरेसे
आपल्या जवळ आमदार असेल तरी जनता विनायक राऊत साहेब यांच्या पाठीशी आहे. हा इतिहास नाही वर्तमान आहे. आणि भविष्य काळ पण राहणार . तुम्ही ज्या आमदारांचे गणित मांडत आहात त्यात 50 खोके वाले आहेत. त्यांच्या बरोबर जनता किती आहे हे तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही. राऊत पहिल्यांदा निवडून आले तेव्हा किती आमदार होते. तरी सुध्दा राऊत हे 2 लाखाचे मत्ताधिक्यानी निवडून आले. आणि पुढील निवडणुकीत 250000 मतांनी निवडून आले. आणि आम्ही शिवसैनिक यावेळी 3 लाखांनी निवडून आणू त्याची काळजी करू नका. असा टोला शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना लगावला आहे.श्री जाधव यांनी म्हटले आहे, आमचे वैभव नाईक आणि भास्कर जाधव हे दोन वाघ तुमच्या आमदारांना पुरून उरतील. आणि राहिला घाबरण्याचे तर खरोखर भाजपा ची ताकत आहे तर हे फोडा फोडीचे राजकारण थांबून मत पत्रिकेवर मतदान घ्यावे. असे देखील त्यांनी म्हटले आहे.
कणकवली/ प्रतिनिधी