आंगणेवाडीसाठी एलटीटी- करमाळी स्पेशल

खेड : सिंधुदुर्गातील आंगणेवाडी भराडी देवीच्या २ मार्चच्या जत्रेसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांमुळे रेल्वेगाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने १ मार्च रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी आंगणेवाडी फेस्टिव्हल चालविण्यात येणार असल्याचे शुक्रवारी सायंकाळी जाहीर केले. या फेस्टिव्हलचे २६ फेब्रुवारीपासून आरक्षण खुले होणार आहे. ०१०४३/ ०१०४४ क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस- करमाळी फेस्टिव्हल स्पेशल १ मार्च रोजी रात्री १०.१५ वा. एलटीटीहून सुटून दुसऱ्या दिवशी स. १० वा. करमाळी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ३ मार्च रोजी करमाळी येथून दु. ३.२० वा. सुदून पहाटे ३.४५ वा. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. एलएचबी डब्यांच्या २१ स्पेशलला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम आदी स्थानकात थांबे आहेत.

error: Content is protected !!