मालोंड गावी श्री. देवी सती आई वार्षिक जत्रोत्सव

मालवण तालुक्यातील मालोडं गावी श्री.देवी सती आईचां वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दिनांक २०/२/२४ ते २४/२/२४ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येनार आहे. कार्यक्रम दि.२०/२/२४ -मालोंड गावातील कुलदैवतांचे व ग्राम देवीदेवतांचे दिवसभर मानपान व निमंत्रण- दि.२१/२/२४ रोजी संध्याकाळी- जोगवा व रात्री गोंधळ .

दि. २२/२/२४ रोजी सकाळी. ८ ते १२:३० कळस पूजन व श्रीदेवी सतीआई मंदिरावर कळसाची संपूर्ण पूजा विधी करून स्थापना. दिनांक
२३/२/२४ रोजी श्री.देवी सतीआईचा वार्षिक जत्रोत्सव. अंभ्यंगस्नान, अभिषेक, होमहवन, सत्यनारायण महापूजा,आरती,प्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी हळदीकुंकू, रात्री सुस्वरभजन, पालखी सोहळा, दशावतारी नाटक – इ.कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेनुसार सादर केले जातील.
दि. २४/२/२४- सांगता समारंभ तरी सर्व प्रभुकुळ विस्तार बंधू भगिनींनी आणि गावातील भक्तगण यांनी उपस्थित राहून कळस दर्शन आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी प्रभुकुल विस्तार संस्था अध्यक्ष पांडुरंग मालाडकरआणि सरचिटणीस सदा मालाडकर यांनी सर्वांना आवाहन केले आहे.

error: Content is protected !!