खारेपाटण हायस्कुल संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांच्या विज्ञान गीताने उपस्थितांची जिंकली मने..

सावंतवाडी येथे झालेल्या 51 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमात खारेपाटण हायस्कुल च्या विद्यार्थ्यांनी सादर केले विज्ञान गीत

सावंतवाडी येथे झालेल्या 51 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाच्या उद्घाटनानिमित्त शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण च्या संगीत विभागातर्फे विज्ञान गीत सादर करण्यात आले. या विज्ञान गीताचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले. याप्रसंगी महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागातील अनेक मान्यवर संचालक, आणि अधिकारी उपस्थित होते…
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे संचालक कृष्णकुमार पाटील, राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ.राधा अतकरी, शिक्षण उपसंचालक महेश चोथे, प्रवीण राठोड, डॉ.राजकुमार अवसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर, डायट सिंधुदुर्ग चे प्राचार्य डॉ. कांबळे असे अनेक मान्यवर उपस्थित होते .

या विज्ञान गीतास खारेपाटण विद्यालयाचे संगीत शिक्षक श्री. संदिप पेंडूरकर सर यांनी संगीतबद्ध केले आहे ….
संगीत विभागाच्या विद्यार्थीनी कु.सई प्रदीप लोकरे (नववी अ), कु.सोनाली विलास तांबे (नववी ब), कु.प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई (आठवी ब), कु.तेजल सुभाष ठाकूरदेसाई (आठवी अ), कु.तनुश्री लवेश सौंदळकर (सातवी), कु. सिफा इमरान खान (सातवी), कु. राधा राजन ठाकूरदेसाई (सहावी), कु. अनुष्का विनोद सुतार (सहावी) यांनी या सादरीकरणामध्ये सहभाग घेतला ….

संगीत विभागाच्या सर्व मुलींचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे सर, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. संजय सानप सर, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!