शिवजयंती उत्सव समिती खारेपाटण यांच्यावतीने शिवजयंती निम्मित विविध कार्यक्रमांचे आयोजन

खारेपाटण येथील शिवजयंती उत्सव समिती याच्यामार्फत दरवर्षी अगदी जल्लोषात शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. यावर्षी देखील दिनांक 19फेब्रुवारी 2024 रोजी भरगच्च अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये
सकाळी ९:००वा.:-
◆केदारेश्वर मंदिर ते खारेपाटण किल्ला शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक
◆मुख्य आकर्षण- लाठी काठी/मर्दानी खेळ
(सर्वांनी पारंपरिक मराठमोळ्या वेषात सहभागी व्हावं, ही विनंती करण्यात आली आहे.)
तसेच सकाळी ११:००वा.:-
◆किल्ले खारेपाटण इथे दुर्गादेवीला श्रीफळ अर्पण करून श्री. शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन
◆ध्वजारोहण
◆महाराष्ट्रगीत
◆शिवप्रेरणा व ध्येय मंत्र
◆मान्यवर मनोगत
◆अल्पोपहार
सायंकाळी ६:३०.:-
◆शिवव्याख्यान- श्री.युयुत्सु आर्ते सर-शिव व्याख्याते- देवरुख
◆शिवगीते/पोवाडे/समूहगीते
◆कराओके- मराठी भावगीते
◆खास आकर्षण- शिवराज्याभिषेक सोहळा
◆आभार व समारोप अशी संपूर्ण दिवसाची रूपरेषा असून सदर कार्यक्रमात सहभागी मान्यवर संस्था ग्रामपंचायत खारेपाटण व समस्त खारेपाटण ग्रामस्थ
श्री कालभैरव दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट
राष्ट्रीय सेवा योजना खारेपाटण महाविद्यालय खारेपाटण
सकल मराठा समाज खारेपाटण पंचक्रोशी उपस्थित असणार आहेत.खारेपाटण येथील शिवजयंती उत्सवाला आवर्जून सहभागी होण्याचे आवाहन समिती च्या वतीने करण्यात आले आहे.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!