आचरा येथे १९ रोजी शिवजन्मोत्सव सोहळा
ठाकरे शिवसेना आचरा विभाग व सिंहगर्जना ग्रुपतर्फे आचरा तिठा येथे शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सोमवार 19 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० वा. छत्रपत्नी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, ११ वा. स्थानिक मुलांचे पोवाडा गायन, सायंकाळी ४ वा. शिवचरित्रावर आधारित पथनाट्य, ४.३० वा. शिवचरित्रावर आधारित मालवण तालुका मर्यादित वेशभूषा व अभिनय स्पर्धाः विजेत्यांना आकर्षकं पारितोषिके देण्यात येतील. प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या १८ वर्षांखालील १५ स्पर्धकांना प्रवेश दिला जाईल. सायंकाळी ५ वा. मर्दानी खेळ (तलवारबाजी, मल्लखांब), ५.३० वा. आचरा पंचक्रोशीतील सर्पमित्रांचा सत्कार, आमदार वैभव नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा शिवसेना आचरा विभागातर्फे जाहीर सत्कार, ७.३० वा. वारकरी दिंडी भजन, पारवाडी-आचरा : खास आकर्षण छत्रपती शिवाजी महाराजांचा आकर्षक देखावा आदी कार्यक्रम होणार आहेत. अधिक माहितीसाठी विद्यानंद परब (९४२११४४३७६), माणिक राणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे..
आचरा–अर्जुन बापर्डेकर




