शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कलमठ मध्ये रक्तदान शिबिर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कलमठ माणिक चौक, बाजारपेठ या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन 18 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. सकाळी 9 ते दुपारी 1 वाजता हे शिबीर होणार आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी व शिबिरात सहभागी होण्यासाठी अनुप वारंग, 98 22 36 10 36 धीरज मेस्त्री, सचिन कोचरे, नितेश भोगले यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कणकवली /प्रतिनिधी