हरकुळ बुद्रुक येथील माघी गणेश जयंतीला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती

श्री देव गोडांबा आईनतळवाडी व गणेश मंदिर जंगमवाडी येथील माघी गणेश जयंती सोहळ्याला दिली भेट

हरकुळ बुद्रुक येथे प्रतिवर्षा प्रमाणे यावर्षी ही माघी गणेश जयंती सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. विविध सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रम देखील यावेळी संपन्न झाले. हरकुळ बुद्रुक येथील श्री देव गोडांबा आईनतळवाडी व श्री गणेश मंदिर जंगमवाडी येथे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी भेट दिली. यावेळी श्री देव गोडांबा आईनतळवाडी व श्री गणेश मंदिर जंगमवाडी मंडळांच्या वतीने नाईक यांचे शाल श्रीफल देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी हरकुळ बुद्रुक गावचे सरपंच आनंद ठाकूर. उपसरपंच आयुब पटेल. कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख राजेश पावसकर. दिवाकर मुरकर. महेंद्रकुमार मुरकर. नारकर गुरुजी. सुधीर खोचरे. जेष्ठ शिवसैनिक मोहन सोहनी. आदी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!