स्वच्छता हिच देशसेवा – राजेंद्र पेडणेकर

माऊली मित्र मंडळ कणकवली आणि जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्रमंडळाच्या वतीने ओसरगाव तलाव परिसरात स्वच्छता मोहीम
कणकवली दि.३१जाने.( प्रतिनिधी) स्वच्छता हिच देशसेवा हे ब्रीद अंगिकारत माऊली मित्र मंडळ कणकवली आणि जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्रमंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार 31 जानेवारी रोजी ओसरगाव तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी ओसरगाव सरपंच सौ.सुप्रिया कदम, ओसरगाव उपसरपंच तथा समाजसेवक बबली राणे, माऊली मित्र मंडळ सल्लागार सी.आर. चव्हाण, माजी ग्रा.प
सदस्य सुदर्शन नाईक, ग्रामस्थ विनायक अपराज, चिन्मय भिसे , सत्यवान मोहिते ,भगवान कासले, प्रसाद पाताडे ,प्रसाद उगवेकर सईद नाईक, ज्ञानदेव मोडक, बाबुराव घाडीगांवकर, अविनाश गावडे ,प्रभाकर कदम आदी उपस्थित होते.
यावेळी माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर म्हणाले की, स्वच्छता हिच देशसेवा आहे .माऊली मित्र मंडळ आणि जूना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्रमंडळाच्या वतीने ओसरगाव तलाव परिसरातील स्वच्छता करुन सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे .ओसरगाव माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहेत.असे गौरवोद्गार राजेंद्र पेडणेकर यांनी काढले.