रोटेरियन मेघा गांगण, अजय गांगण यांच्याकडून कणकवली रोटरी क्लब ला दोन रुग्ण बेड प्रदान

कै. अनंत गांगण यांच्या स्मृती प्रित्यर्थ जपली सामाजिक बांधिलकी
कणकवली रोटरी क्लब सदस्य
रोटरीयन मेघा गांगण, माजी नगरसेवक अजय गांगण या दाम्पत्याने कै. अनंत गांगण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन रुग्णबेड कणकवली रोटरी क्लब ला प्रदान केले. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद मानून गांगण दाम्पत्याने हे रुग्णबेड रुग्णसेवेसाठी रोटरी क्लब ला भेट दिले. याचा वापर गरजू रुग्णांसाठी करण्यात येणार असल्याचे कणकवली रोटरी क्लब प्रेसिडेंट रवी परब यांनी दिली. यावेळी रोटरीयन मेघा गांगण, डॉ विद्याधर तायशेटे, सुप्रिया नलावडे,
अनिल कर्पे ,अंकिता कर्पे
धनंजय कसवणकर आदी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी





