स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद राणे बिनविरोध

कार्याध्यक्षपदी चंद्रकांत हडकर तर सचिवपदी सुनील खरात

श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी या न्यासाच्या अध्यक्षपदी सदानंद राणे यांची तर सचिव पदी सुनील खरात यांची निवड करण्यात आली या न्यासाची२०वी वार्षिक सभा नुकतीच न्यासाच्या कार्यालयात पार पडली यावेळी सन २०२४ ते २६या कालावधीसाठी नवीन कार्यकारी मंडळ निवडण्यात आले या कार्यकारी मंडळाचे अध्यक्षपदी सदानंद राणे यांची निवड करण्यात आली कार्याध्यक्षपदी चंद्रकांत हडकर ,उपाध्यक्षपदी दिनेश साळकर , दीपक सुर्वे, सचिव पदी सुनील खरात सहसचिव कल्याण साळकर ,खजिनदार प्रफुल्ल माळकर,सल्लागार रामदास प्रभू , पंडित खोत सदस्य सुधीर घागरे संचिता राणे याप्रमाणे कार्यकारी मंडळ एक मताने निवडण्यात आले. यावेळी संस्थापक सदस्य यशवंत परब यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष सदानंद राणे तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे स्वागत
करण्यात आले यावेळी अध्यक्ष सदानंद राणे यांनी मनोगत व्यक्त करत संस्थेचे कार्य असे सेवाभावी वृत्तीने चालू ठेवणार असल्याचे मत व्यक्त केले. कार्याध्यक्ष चंद्रकांत हडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आचरा, अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!