कणकवली पोलीस निरीक्षक पदी मारुती जगताप यांची नियुक्ती

रत्नागिरी जिल्ह्यातून कणकवली पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली झाल्याने निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजणार
कणकवली पोलीस स्टेशनच्या रिक्त असलेल्या पोलीस निरीक्षक पदी रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या मारुती ज्ञानदेव जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कणकवली पोलीस स्टेशनला असलेले अमित यादव यांची बदली झाल्यानंतर या पदाचा कार्यभार सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. श्री जगताप हे यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची बदली करण्यात आल्याने येत्या काळात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.
दिगंबर वालावलकर, कणकवली