आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी देवगड तालुक्यातील महिलेवर कणकवली पोलिसात गुन्हा दाखल

कासार्डे येथे करते महिला मच्छी विक्रीचा व्यवसाय

कणकवलीतल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश रावलेंनी घेतला परिस्थितीचा आढावा

मूळ देवगड येथील रहिवासी असलेल्या एका 44 वर्षीय मुस्लिम समाजातील महिलेने आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी तिच्यावर कणकवली पोलिसात भादवी 295 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही महिला मूळ देवगड तालुक्यातील असली तरी ती कासार्डे तिठा या ठिकाणी मच्छी विक्रीचा व्यवसाय करते. तिने ठेवलेला स्टेटस हा आक्षेपार्ह असल्याची बाब निदर्शनास येताच कासार्डे येथील वातावरण काल तणावपूर्ण बनले होते. त्यानंतर कणकवली पोलिसांनी रात्री काल रात्री कासार्डे येथे धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान देवगड तालुक्यातील त्या महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी फिर्याद दिली आहे. कणकवली तालुक्यात गेले दोन दिवसात या लागोपाठ अशा प्रकारच्या घटना घडल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे. दरम्यान या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आज कणकवलीत दंगल नियंत्रक कार्यरत ठेवण्यात आले असून, पोलीस उपाधीक्षक ऋषिकेश रावले यांनी कणकवली पोलिसात पोलीस स्टेशनला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

कणकवली/ प्रतिनिधी

error: Content is protected !!