आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी कणकवली पटवर्धन चौकात भाजपाकडून जय श्रीराम च्या घोषणा
तालुक्यातील एका रिक्षाचालका विरोधात भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक
कणकवली पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात
कणकवली लगतच्या एका गावातील रिक्षा चालकाने आपल्या स्टेटसवर धार्मिक तेढ निर्माण होणारा स्टेटस ठेवल्याच्या रागातून काही युवक कणकवली शहराच्या मुख्य चौकात भाजपा चे कार्यकर्ते गोळा झाले.त्या ठिकाणी जोरदार जय श्रीराम च्या घोषणा दिल्या.काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.तुम्ही तक्रार द्या,आम्ही गुन्हा दाखल करतो.वाद नको,अशी विनंती केली. मात्र अर्धा तास पोलीस आणि जमलेल्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू होती .अधून मधून जोरदार घोषणाबाजी कार्यकर्ते करीत होते. मात्र, त्या तरुणाच्या घराकडे जाऊन त्या तरुणाने ठेवलेल्या स्टेटस च्या वादावर माफी मागून पडदा टाकण्यासाठी भाजपा पदाधिकारी गेले आहेत.पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात पोलीस बंदोबस्त वाढ करण्यासाठी राखीव पोलीस दलाची तुकडी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
त्यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, उपाध्यक्ष सोनू सावंत, महेश गुरव, मिलिंद मेस्त्री, राजश्री धुमाळे ,सदानंद चव्हाण आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज पाटील व कणकवली पोलीस यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणी परिस्थिती नियंत्रण ठेवण्याचे काम सुरू आहे.
कणकवली प्रतिनिधी