DK फाउंडेशन कणकवली आयोजित जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत आयडियल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी चमकले.

कणकवली/मयुर ठाकूर
DK फाउंडेशन कणकवली आयोजित जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
इयत्ता ५ वी
१) चिन्मय उदय राणे (जिल्ह्यात पहिला)
२) स्वराली राजेश कदम( जिल्ह्यात दुसरी)
३) रुद्रा भक्तप्रल्हाद बांदिवडेकर (जिल्ह्यात तिसरी)
इयत्ता ८ वी
१)चैतन्य श्रीकांत दळवी (जिल्ह्यात पहिला)
२) खुशी विशाल आमडोसकर (जिल्ह्यात दुसरी)
३) गंधर्व विठ्ठल नारकर (जिल्ह्यात तिसरा)
सर्व सहभागी स्पर्धकाना ही प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आणि शुभेच्छा दिल्या .
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे , उपाध्यक्ष श्री मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल ,सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे ,सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर, खजिनदार सौ. शितल सावंत मॅडम सल्लागार श्री. डी.पी. तानावडे, मुख्याध्यापिका सौ अर्चना शेखर देसाई, पालक वर्ग आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गातून अभिनंदन केले जात आहे.