प्रसिद्ध भजनी बुवा समिर कदम यांचा “अष्टपैलु भजन सम्राट” पुरस्काराने सन्मान.

कणकवली/मयुर ठाकूर.

कोकणातील सुप्रसिद्ध भजनकार, भजन महर्षी सन्माननीय कै. काशीरामजी परब बुवा‌ यांचे शिष्य श्री. सुशिल गोठणकर बुवा यांचे शिष्य, लिंग रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पोखरण ता. कुडाळ चे सुप्रसिद्ध भजनी बुवा श्री. समिर कदम बुवा यांना मैत्री संस्था, मुंबई मित्र, साई अर्पण फाउंडेशन व सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं भारत सन्मान राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार २०२४ मध्ये “अष्टपैलु भजन सम्राट” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यासाठी शिवसेना खासदार शिर्डी आदरणीय वाकचौरे साहेब यांच्या हस्ते बुवांना सन्मानित करण्यात आले.
समिर कदम बुवांच्या “बुवा समिर कदम ऑफिशियल” या युट्युब चॅनलवर नुकताच “मन धाव घेई चरणी- २०२४” हा पाच भजन गीतांचा अल्बम प्रदर्शित झाला आहे. रसिक जणांचा त्या गाण्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. समिर कदम बुवा यांच्यावर सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहॆ.

error: Content is protected !!