सुकी मिरची विक्रीवरून मंगळवार आठवडा बाजारात स्थानिक व पर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची

नगरपंचायत प्रशासनाकडून या प्रकरणी मध्यस्ती

यापूर्वी देखील स्थानिक व पर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये घडला होता वादाचा प्रसंग

कणकवली आठवडा बाजारा च्या निमित्ताने जिल्ह्या बाहेरून येणारे सुकी मिरची विक्रेते आठवडा बाजारात न बसता कणकवली आप्पासाहेब पटवर्धन चौकात बसून व्यवसाय असल्याला स्थानिक व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतला. यावेळी पर जिल्ह्यातील विक्रेते व स्थानिक व्यापारी यांच्यात बाचाबाची देखील झाल. स्थानिक व्यापाऱ्यांनी नगरपंचायत प्रशासनाच्या स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत याना ही माहिती दिली. त्यानंतर प्रशासनाने त्यांना त्याठिकाणाहून उठवून आठवडा बाजारात बसण्याच्या सूचना दिल्या. पर जिल्ह्यातील विक्रेत्यांनी इतरांप्रमाणे आठवडा बाजारात आपला व्यवसाय करावे, अशी मागणी स्थानिक विक्रेत्यांनी केली. या पूर्वी देखील पर जिल्ह्यातील कडधान्य विक्रेत्यांनी आठवडा बाजारात बसू नये अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांनी केली होती. यात स्थानिक व्यापारी व काही नागरिक यांच्यात पटकीदेवी जवळ बाचाबाची झाली होती. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणी स्थानिक व्यापाऱ्यांनी आमदार नितेश राणेंकडे निवेदना द्वारे मागणी केली होती.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!