गावातील रानभाज्या आरोग्य जपतात – सौ अर्चना बंगे

गावातील रानभाज्या ह्या आरोग्य जपतात. त्याच बरोबर गावातील आपले अस्तित्व जपतात, असे प्रतिपादन शिवसेनेच्या उध्दव ठाकरे पक्षाच्या पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी नेरुर येथे केले.नेरूर येथे आयोजित रानभाज्या महोत्सव कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
सौ बंगे म्हणाल्या रान भाज्या ही संकल्पना नेरुर येथील रानमाणुस राजा शृंगारे यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली. म्हणूनच आज कुडाळ तालुक्यात रान भाज्या प्रदर्शन किंवा बाजार भरवले जात आहेत ही कौतुकास्पद बाब आहे.
यावेळी या रानभाज्या महोत्सव उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी पंचायत समिती सदस्या सौ दीप्ती नाईक, माजी पंचायत समिती सदस्या सौ दीपश्री नेरकर, आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!