झुंजार मित्र मंडळ खारेपाटण आयोजित आंतरराज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत राजाराम वॉरियर्स सावंतवाडी संघ विजेता

गणराज इलेव्हन मिठबाव संघ उपविजेता

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून भरविण्यात आलेल्या झुंजार मित्र मंडळ खारेपाटण आयोजित आंतर राज्य स्तरीय भव्य ओव्हरआर्म टेनिस. बॉल क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात राजाराम वॉरियर्स संघ तळवडे,सावंतवाडी या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर गणराज इलेव्हन मिठबाव हा संघ या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरला.
या स्पर्धेच्या विजेत्या राजाराम वॉरियर्स सावंतवाडी संघाला रोख रुपये १,११,१११/- व आकर्षक चषक तर उपविजेता संघ गणराज इलेव्हण मिठबाव या संघाला रोख रुपये ५५,५५५/- व आकर्षक चषक देऊन आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले.तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून मिठबाव संघाचा खेळाडू नरेश गोविलकर,उत्कृष्ट गोलंदाज – सागर कांबळे,उत्कृष्ट शेत्ररशक- आरिफ (ब्लू लाईन मोसम) यष्टिरक्षक म्हणून प्रथमेश पवार(मिठबाव), तर स्पर्धेचा मालिकावीर आणि सामनावीर चषक चा मानकरी ठरला तो राजाराम वॉरियर्स सावंतवाडी संघाचा खेळाडू ओंकार पाटील या सर्व खेळाडू यांना आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी आमदार नितेश राणे,माजी जि.प.सदस्य श्री रवींद्र जठार,माजी सभापती श्री दिलीप तळेकर,खारेपाटण च्या सरपंच सौ प्राची इसवलकर,सामाजिक कार्यकर्ते श्री रुपेश सावंत,रफिक नाईक,प्रवीण लोकरे,सुधीर कुबल,महेश कोळसुलकर,लियाकत काझी,मंगेश गुरव,मोहन कावळे,विरेंद्र चिके,प्रशांत गाठे,सूर्यकांत भालेकर,सुकांत वरूणकर,विजय देसाई,परवेज पटेल,शरद तोरसकर,शेजवली सरपंच मंदार राणे,कुरांगावणे सरपंच पप्पू ब्रम्हदडे,ग्रा.प. सदस्य श्री गुरूप्रसाद शिंदे,जयदीप देसाई, किरण कर्ले,सावंतवाडी संघाचे मालक श्री राजाराम गावडे,मिठबाव संघाचे मालक संजय मुद्रस, खारेपाटण पोलीस दूरशेत्राचे प्रमुख उद्धव साबळे, आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे झुंजार मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री संकेत शेट्ये यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले.
झुंजार मित्र मंडळ खारेपाटण च्या वतीने येथील ब्रमहपुरी मैदानावर भरविण्यात आलेल्या या आंतर राज्य स्तरीय क्रिकेट स्पर्धेला १५ फेब्रुवारी २०२३ ला प्रारंभ झाला होता.सलग ५ दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग,रत्नागिरी सह कोल्हापूर ,सांगली,सातारा रायगड ,ठाणे,मुंबई,गोवा व पुणे तसेच महाराष्ट्र राज्यसह कर्नाटक येथील नामवंत खेळाडूंनी व संघांनी सहभाग घेतला होता.
आमदार नितेश राणे यांनी यावेळी झुंजार मित्र मंडळाच्या क्रिकेट स्पर्धेला शुभ देत खारेपाटण सारख्या ग्रामीण भागात एवढी मोठ्या रकमेची स्पर्धा भरवील्यामुळे मंडळाचे कौतुक केले. तसेच जिल्ह्यातील खेळाडूंच्या पाठीशी आपण नेहमीच राहणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले.
या क्रिकेट स्पर्धेला खासदार विनायक राऊत,संदेश पारकर,संजय पडते,अतुल रावराणे,सौ.जान्हवी सावंत आदी मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.या स्पर्धेला भाजप आमदार नितेश राणे यांनी रोख रुपये १ लाख रुपये देणगी दिली. तर स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल खारेपाटण नडगिवे चे अध्यक्ष मनोज गुळेकर यांनी दिले.तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक युवा सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील नारकर यांनी दिले.तसेच या स्पर्धेचे आकर्षक सर्व चषक सामाजिक कार्यकर्ते श्री रुपेश सावंत यांच्यावतीने देण्यात आले.तर या स्पर्धेचे यु ट्यूब चनेल टेनिस स्पोर्ट लाईव्ह प्रक्षेपण ब्लू लाईन चे मालक नुर काझी यांच्या सौजन्याने करण्यात आले.तर स्पर्धेला लागणारे सर्व चेंडू श्री परवेज पटेल यांनी पुसकृत केले.व स्पर्धेला लागणारे सर्व पाणी श्री उदय मिठारी यांनी पुरविले.
तसेच या संपूर्ण स्पर्धे करीता पंच म्हणून संजय पाटील,सुनील देशमुख परवेज खान यांनी काम पाहिले तर समालोचक म्हणून अमोल जमदाडे, विवेक परब,काका म्हात्रे,रोहन कदम, प्रसाद चाळके तर संपूर्ण स्पर्धेचे गुणलेखन गणेश राऊळ यांनी केले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!