चित्रकार आणि पत्रकार रजनीकांत कदम यांनी साकारले अयोध्या येथील प्रभु श्रीराम यांचे मंदीर

दि. २२ जानेवारी २०२४ (पौष शुक्ल द्वादशी शके १९४५) या शुभदिनी, रामजन्मभुमी अयोध्या येथे येथील प्रभु श्रीराम मंदिरात प्रभु श्रीरामांची नवीन मुर्ती विराजमान होवुन त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून कुडाळ येथील चित्रकार व पत्रकार रजनीकांत कदम यांनी अयोध्या येथील प्रभु श्रीराम मंदिराचे व प्रभु श्रीराम यांचे विलोभनीय चित्र रेखाटलेले आहे.
अयोध्या येथील प्रभु श्रीराम मंदिरात प्रभु श्रीरामांची नवीन मुर्ती विराजमान होवुन त्याची प्राणप्रतिष्ठा या सोहळ्याने अयोध्येसह संपूर्ण देशात अभुतपूर्व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन, विविध कलाकार त्यांच्या कलेच्या माध्यमातून कलाकृतीतुन या सोहळ्याचा आनंद व्यक्त करीत आहेत. याच प्रकारे या सोहळ्याच्या पुर्व संध्येला चित्रकार रजनीकांत कदम यांनी हे चित्र रेखाटण्यास सुरूवात केली व सोमवारी पहाटे हे चित्र पुर्ण केले. चित्रकार रजनीकांत कदम यांच्या या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.





