हळवल येथील समीर गुरव यांचे निधन

माजी सरपंच दीपक गुरव यांना बंधू शोक
हळवल येथील रहिवासी समीर सुभाष गुरव ( वय 35 रा. हळवल गुरववाडी ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. अतिशय मनमिळावू स्वभावाची व्यक्ती म्हणून समीर परिचित होते. त्यांच्या जाण्याने हळवल गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, बहीणी, भावोजी, भाची, काका काकी, चुलत भाऊ असा परिवार आहे. समीर हे आमदार वैभव नाईक यांच्या जवळ या पूर्वी चालक म्हणून काम करत होते. तर हळवल माजी सरपंच दिपक गुरव यांचे ते बंधू होत.
कणकवली /प्रतिनिधी