राष्ट्रसेविका समिती तर्फे सघोष पथसंचलनाचे आयोजन

कणकवली  – राष्ट्रसेविका समिती कोंकण प्रांत, जि. सिंधुदुर्ग यांचे मार्फत रविवार दि. २१ जानेवारी २०२४ रोजी कणकवली येथे प्रतिवर्षाप्रमाणे मकरसंक्रमणानिमित्त सघोष पथसंचलनाचे आयोजन करण्यात येत आहे.
        सदर दिवशी दुपारी ठीक ३.३० ते ५.३० या वेळेत शिवाजी महाराज चौक ते पटवर्धन चौक व पटवर्धन चौक ते पुन्हा शिवाजी महाराज चौक असा संचलन मार्ग असेल.

जिल्ह्यातील सर्व सेविकांनी या पथसंचलनात सहभागी व्हावे तसेच नागरिकांनी सुद्धा कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन जिल्हा कार्यवाहिका मा. मृणाल देसाई व नगर कार्यवाहिका मा. प्रतिभा करंबेळकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!