साटेली भेडशीतील आंदोलन ठेकेदार व आंदोलकांच्या संगनमताने
🟡 शिवसेना तालुकाप्रमुख गवस व निंबाळकर यांचा आरोप

✅प्रतिनिधी l दोडामार्ग
कोकण नाऊ l News Channel
साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राविषयी सुरू असलेले आंदोलन हे ठेकेदार व आंदोलक यांच्या संगनमताने सुरू असल्याचा आरोप शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस व राजेंद्र निंबाळकर यांनी केला. नूतन इमारतीचा अधिकृत लोकार्पण सोहळा लवकरच होईल. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना इमारतीच्या सोयी सुविधा पूर्ततेचे प्रमामाणपत्र मिळाले की आरोग्य केंद्र सामान्य लोकांसाठी वैद्यकीय सेवेसह सुरू होईल.
शिंदे सरकारच्या काळातील तालुक्यातील नियोजित कामांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. न्यायालयाने दिलेल्या शिवसेना नाव व चिन्ह या दोन्ही बाबींच्या निकालाचा यावेळी शिवजयंतीचे औचित्य साधून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या पत्रकार परिषदेत त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र ठेकेदाराच्या अनास्थेमुळे राहिले यावर शासनाला दोष देण्यात अर्थ नाही;मात्र त्यावेळी सत्तेत असलेल्याना आता विरोधी बाकावर बसताच याचा विसर कसा पडला याचे आश्चर्य वाटत असल्याचे श्री .गवस व निंबाळकर म्हणाले. तालुक्यात अनेक विकास कामे नियोजित आहेत. या कामातून विकासगंगा आल्याचे पाहावयास मिळेल असेही ते म्हणाले, दोडामार्ग तालुक्यातील उपकेंद्राचे कामही लवकरच सुरू होईल त्यादृष्टीने प्राथमिक कामे रुग्णालय परिसरात सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, एमएनजीएल संदर्भातही सत्ताधारी म्हणून आपली भूमिका स्पष्ट करताना सदरचा ठेकेदार कंपनी व बांधकाम विभाग यांची संयुक्त बैठक लावून प्रश्न सोडविला जाईल असेही ते म्हणाले.
दरम्यान,दोडामार्ग तालुक्यातील दोन विभिन्न पक्षाचे पदाधिकारी जो एक सत्ताधारी पक्ष व दुसरा विरोधी पक्षात आहे त्यांनी शिंदे सरकारचा नामोनिशाण मीटवू असा विडा उचलला आहे त्या संबंधी एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आमच्या समोर वक्तव्य करावे ज्यांची लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्याची लायकी नाही त्यांनी अशा वल्गना करू नयेत त्यांना जशास तसा धडा शिकवू असा इशारा उपतालुकाप्रमुख बाबाजी उर्फ दादा देसाई यांनी दिला.यावेळी उपतालुकाप्रमुख प्रेमानंद देसाई, तालुकसंघटक गोपाळ गवस, सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष शैलेश दळवी, लाडू जाधव, युवासेना भगवान गवस, शहराध्यक्ष लवू मिरकर, संदीप गवस, गुरुदास सावंत, झरेबांबर सरपंच अनिल शेटकर, चंद्रकांत जाधव यांसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ,दोडामार्ग

error: Content is protected !!