कणकवली महाविद्यालयात अभिनेते दिगंबर नाईक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

कणकवली/मयुर ठाकूर
येथील शिक्षण मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. या वेळी अभिनेते दिगंबर नाईक यांच्या हस्ते विविध क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
या वेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संजय मालंडकर,प्र. प्राचार्य युवराज महालिंगे, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बाळकृष्ण गावडे, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, डॉ. प्रा.सोमनाथ कदम, प्रा. डॉ.बी. एल. राठोड, प्रा. डॉ. श्यामराव दिसले, पर्यवेक्षक कांतीलाल जाधवर, प्रा. हरिभाऊ भिसे,कार्यालयीन अधीक्षक श्री संजय ठाकूर, श्री संजय राणे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.