फोटोग्राफर असोसिएशनची धर्मादाय आयुक्तांकडे अधिकृत नोंदणी

तालुकाध्यक्ष विनायक पारधीये यांची माहिती

संतोष कांबळी यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

कणकवली तालुका फोटोग्राफर असोसिएशनची विशेष बैठक जाणवली वृंदावन हॉल येथे पार पडली. फोटोग्राफर असोसिएशन कणकवली तालुका ह्या नावाने ही संघटना धर्मदाय आयुक्तांकडे अधिकृत नोंदणी करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष विनायक पारधीये यांनी कार्यकारिणी सदस्य व सभासदांना यांना दिली.

बैठकीत संघटनतर्फे राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. फोटोग्राफरांचा व्यवसायवृद्धीसाठी काय काय करता येईल, यावर विचारमंथन झाले. याशिवाय फोटोग्राफरांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. आली. दरम्यान, शहरातील ज्येष्ठ फोटोग्राफर तथा सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी संतोष कांबळी यांचा सेवानिवृत्तीपर फोटोग्राफर संघटनेच्यावतीने शाल व पुष्पच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष कृष्णा कांबळी,सचिव सुरजित ढवण,खजिनदार विनोद दळवी, संतोष कांबळे, संजय राणे,संतोष सावंत, सत्यजित गुडेकर, प्रकाश निमकर,गणेश लुडबे,अनिकेत उचले,गणेश इस्वलकर,नितीन कुवळेकर,योगेश्वर मोडक,योगेश चव्हाण, राजेश सोहनी, हेमंत काळसेकर,आनंद काळसेकर, संजय काणेकर, वसंत आडीवरेकर, सागर कराळे, संजोग सावंत,मारुती मेस्त्री आदि उपस्थीत होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!