सुलोचना मधुकर जाधव रा.कळवा ता.जि.ठाणे यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्ताने समर्थ आश्रमातील बांधवांना अन्नदान

समर्थ आश्रमः..सौ.सुलोचना मधुकर जाधव ,राहणारः कळवा,ता.जि.ठाणे यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्ताने जीवन आनंद संस्था संचलित विरारफाटा-वरठापाडा ता.वसई येथील समर्थ आश्रम मधील बांधवांसाठी अन्नदानाचे आयोजन केले.
सुलोचना मधुकर जाधव आजींचे वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झाल्यानंतर त्या गावातून मुंबईत आल्या. तेव्हापासून त्यांनी सर्व कुटुंबाची जबाबदारी हसतमुखाने सांभाळली. घरात दीर, नणंद, सासू सासरे असा सगळा परिवार, सर्वांना आनंदी ठेवण्यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असतो.

   सुलोचना आजींना स्वयंपाकाची मुळातच आवड असल्याने त्या वेगवेगळे पदार्थ बनवून सर्वांना प्रेमाने खायला घालतात. शिवणकाम वीणकाम हे छंद वयाच्या पंचाहत्तरीतही सांभाळतात. वीणकामामधून कापडी पिशव्या, गोधड्या शिवून घरातील नवीन पाहुण्यांना मायेची ऊब देतात.वीणकामातून नवनवीन प्रकार बनवून घर सजवतात....अशी त्यांची ओळख  त्यांच्या भाची स्मिता नितीन जाधव यांनी करून देवून ७५ व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचे अभिष्ट चिंतन केले.

   आपले कौटुंबिक जीवन आनंदाने आणि सुखासमाधानाने जगत असताना समाजातील निराधार वंचित बांधवांसाठी आपल्या घासातला घास देणा-या सुलोचना आजींना जीवन आनंद संस्थेकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

किसन चौरे ,कोकण नाऊ

error: Content is protected !!