वाहनाच्या धडकेत वागदेतील वृद्धाचा मृत्यू

शनिवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडला अपघात
धडक देऊन वाहन चालक वाहनासह पसार
कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या वाहनाची जोरदार धडक बसल्याने वागदे डंगळवाडी येथील सत्यवान महादेव तोरस्कर (61) हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज शनिवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास वागदे डंगळघाटी दरम्यान महामार्गावर घडला. वागते डंगळवाडी या ठिकाणी तोरस्कर यांचे घर असून महामार्ग क्रॉस करत असताना त्यांना धडक बसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातानंतर वाहन चालक पसार झाला असून अपघातानंतर गंभीर जखमी स्थितीतच तोरसकर यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळतात ठाकरे गटाचे विभाग प्रमुख रुपेश आंमडोसकर, यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर आदींनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.
दिगंबर वालावलकर /कणकवली