सा. बां. कर्मचारी पतपेढी निवडणुकीत माणिक जाधव बहुमताने विजयी

सर्व स्तरातुन माणिक जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
सार्वजनिक बांधकाम कर्मचारी पतपेढी निवडणूकीमध्ये उर्वरित मतदासंघ चिपळूण, गुहागर मधून अभियंता माणिक जाधव रावसाहेब हे बहुमताने विजयी झाले. त्यांच्या या विजयाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे. माणिक जाधव हे यापूर्वी कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कार्यरत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे.