शिंदेंच्या शिवसेने कडून कणकवलीत जोरदार जल्लोष!

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाचे केले स्वागत

फटाक्यांची आतिषबाजी व जोरदार घोषणाबाजी

राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची असा महत्त्वपूर्ण निकाल देत शिंदेंचे सर्व आमदार पात्र ठरवल्याबद्दल आज कणकवली शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळीत शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी विधानसभा प्रमुख संदेश पटेल, उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, निलेश तेली, सुनील पारकर, भास्कर राणे, चिन्मय रावराणे, महिला तालुकाप्रमुख प्रियांका टेबकर आदि उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!