कणकवलीत ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचा निषेध

जोरदार घोषणाबाजी देत व्यक्त केल्या भावना

आमदार पात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिलेल्या निकालावर राज्यभरात ठाकरे गटा कडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना कणकवलीत शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येतं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचा निषेध केला. ठाकरे गटा सह शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार देखील विधानसभा अध्यक्षांनी पात्र केले. असतानाच शिवसेना मात्र शिंदेंची असा निकाल दिल्याने ठाकरे गटाकडून या निकालाचा निषेध करण्यात आला. यावेळी महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख उत्तम लोके, धीरज मेस्त्री, राजू राठोड, दिव्या साळगावकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!