अवकाळी च्या पार्श्वभूमीवर विमा कंपन्यांना पिक विमा योजनेबाबत कार्यवाहीचे आदेश द्या!

आमदार नितेश राणेंची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी

राज्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून, सर्वत्र शेतकरी संकटात सापडले आहेत. दिनांक ८ जानेवारी व ९ जानेवारी २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये अवकाळी पाऊस पडला असून पुढेही पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
शेतकऱ्यांना अवकाळी पावसापासून झालेल्या नुकसानीबाबत शासनाने “प्रधानमंत्री पिक विमा योजना” व “हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना” या दोन योजनांच्या माध्यमातून नुकसान भरपाई निश्चित करून ती शेतकऱ्यांना देण्यात येते. या योजनेमध्ये बहुसंख्य शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. सदर नुकसान भरपाई मिळण्यासाठी विमा कंपन्यांनी वेळीच कार्यवाही करणे गरजेचे असते. नाहीतर शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहतात.
याबाबत शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाने वरील दोन योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्याना कार्यवाही वेळेवर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार नितेश राणे यानी कृषी मंत्री, धनंजय मुंडे यांच्या कडे केली आहे.

error: Content is protected !!