राहुल परब यांच्या रस्तारोकोच्या इशाऱ्यानंतर मालवण कसाल रस्त्यावरील आनंदव्हाळ घाटीच्या कार्पेटिकरण करण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरुवात

मालवण कसाल रस्त्यावरील आनंदव्हाळ घाटी वरील रस्त्याचे कार्पेटीकरण उघडल्यामुळे नागरिकांना वाहन चालवणे अवघड बनलेले व अपघात घडत होते तरी सदर विषयात कार्पेटीकरण न केल्यास कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य युवासेना उपविभागप्रमुख राहुल परब यांनी रास्ता रोको चा इशारा दिला होता तरी या विषयासंदर्भात आज सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कार्पेटीकरण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे वाहन चालक व कुंभारमाठ आनंदव्हाळ पंचक्रोशीतून समाधान व्यक्त होत आहे





