नवीन डीपी रोड वरील टेंबवाडी चा भाग स्ट्रीट लाईट ने उजळला

माजी नगरसेविका मेघा सावंत यांनी वेधले होते नागरिकांचे लक्ष
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या सुचनेनुसार काम पूर्ण
कणकवली शहरातील टेंबवाडी येथे नवीन डीपी रोड चे काम करण्यात आल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर रहदारी व वाहतूक देखील सुरू झाली आहे टेंबवाडी ते चौंडेश्वरी मंदिर याठिकाणी पूर्णपणे काळोख होता. प्रशस्त झालेल्या या रिंग रोड मुळे सध्या या रस्त्याला मोठया प्रमाणात रहदारी चालू आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन स्थानिक माजी नगरसेविका सौ.मेघा महेश सावंत यांनी तातडीने माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्याकडे स्ट्रीट लाईट बसविण्याची मागणी केली. याबाबत यांनी नगरपंचायत प्रशासनाला सूचना करण्यात आल्या. आणि तातडीने लाईट बसविण्यात आल्याने तेथील नागरिकांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व माजी नगरसेविका सौ मेघा सावंत, यांचे आभार मानत या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली





