मालवण तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखे मार्फत सुकळवाड प्रभागाच्या वतीने संत शिरोमणी गुरु रविदास यांची जयंती साजरी

पोईप : जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग तालुका शाखा मालवणच्या प्रभाग सुकळवाडच्यावतीने संत शिरोमणी गुरु रविदास यांची जयंती सुकळवाड येथे श्री देवी भवानी मंदिर येथे साजरी करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष हरेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर माणगावकर, जेष्ठ मार्गदर्शक तथा माजी जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा पाताडे , वसंत चव्हाण, माजी जिल्हा सरचिटणीस सुयोग धामापूरकर, माजी तालुकाध्यक्ष सुनिल पाताडे, माजी सभापती अजिंक्य पाताडे ,गणेश चौकेकर, शांताराम पाताडे, सहसचिव काशिनाथ पाताडे, दिपक पाताडे, पाताडेवाडी उत्कर्ष मंडळाचे उपाध्यक्ष शरद पाताडे , नारायण पाताडे सुर्यकांत पाताडे, प्रभाग अध्यक्ष विजय पाताडे, प्रभाग सचिव नितीन पाताडे, भरत पाताडे, हेमंत कुमार पाताडे, भूषण गणपत पाताडे, दिपक धामापूरकर, भूषण रमाकांत पाताडे, रमाकांत पाताडे ,प्रसाद पाताडे आदी समाजबांधव उपस्थित होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुयोग धामापूरकर, तर आभार दिपक पाताडे यांनी मानले.
संतोष हिवाळेकर / कोकण नाऊ / पोईप