अखेर आचरा मार्गावर स्ट्रीट लाईट कार्यान्वित

माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी वेगळे होते महावितरणाचे लक्ष
आचरा मार्गावर शाळा नंबर 1 जवळ कणकवलीत गजबजलेल्या ठिकाणी लाईट नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य होते. त्यामुळे ही लाईट सुरू करण्याची मागणी केली जात होती. याबाबत माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी महावितरणचे अभियंता श्री शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता. महावितरण कर्मचारी व नगरपंचायत कर्मचारी यांनी संयुक्तपणे या ठिकाणचे स्ट्रीट लाईट ब्रॅकेट बसवले व दुसऱ्या पोलावर असलेलली झुडपे साफ केली. या नंतर नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
कणकवली प्रतिनिधी