असलदे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर चा २३ डिसेंबर रोजी हरिनाम सप्ताह

भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन

तालुक्यातील असलदे गावचे ग्रामदैवत श्री. देव रामेश्वर पावणादेवीचा सात पाराचा हरिनाम सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे मोक्षदा एकादशी उद्या २३ डिसेंबर रोजी गावठणवाडी चव्हाटा येथे आयोजित करण्यात आला आहे. या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम व दिंडी ,वारकरी भजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

असलदे गावठण येथील चव्हाट्यावर दरवर्षी प्रमाणे हरिनाम सप्ताह निमित्ताने सकाळी ९ वाजता घटस्थापना, वारकरी भजन, त्यानंतर माहेरवाशीण व महिलांचा ओठी भरण्याचा कार्यक्रम, रात्री ८ ते ११ वाजता दिंडी भजन, रात्री ११ वाजता पंचक्रोशीतील वारकरी भजने होणार आहेत.सप्ताहानिमित्त संपूर्ण चव्हाटा परिसर विद्युत रोषणाईने उजळून गेला आहे.
तरी भाविकांनी दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!