गोवेरी येथे २७ पासून सग्रह सहवास्तू शतचंडी पुरश्चरण सोहळा

श्री देव सत्पुरुष व देवी भराडी मंदीरात आयोजन
दि. ३० डिसेंबर रोजी होणार सांगता
प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील गोवेरी येथील श्री देव सत्पुरुष व देवी भराडी मंदीरात 27 ते 30 डिसेंबर या कालावधीत सग्रह सहवास्तू शतचंडी पुरश्चरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध सामाजिक व सावंस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 27 रोजी सकाळी ६.३० वाजता देव आणणे, ७ वाजता देवता पूजन, अभिषेक, यजमान-सक्षौर प्रायश्चित देहशुद्धी, गाऱ्हाणे, संकल्प, गणेश पूजन, पुण्याहवाचन, सभार दान, पुरोहीत पूजन, संकल्प पुण्याहवाचन, आचार्यवरण, देवी स्थापना योगिनी, दुपारी १.३० वाजता आरती नैवेद्य व महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता देवी महात्म, सायंकाळी ७ वाजता आरती, नामजप, रात्री ८ वाजता श्री देव कलेश्वर बाल दशावतार मंडळ ( रायवाडी ) यांचे ‘अघोरी मायाजाल’ नाटक होणार आहे.
दि. २८ रोजी सकाळी ७.३० वाजता स्थलशुदी, देवता पूजन, पाठवाचन, कुकुंमार्जनादि, अग्निस्थापन, वास्तूहवन, ग्रहस्थापना, दुपारी १.३० वाजता नैवेद्य, आरती, महाप्रसाद, सायंकाळी ४.३० वाजता महिलांची फुगडी, ७ वाजता आरती व सामुदायिक नामजप, ७.३० वाजता अष्टावधानसेवा, ९ वाजता आरती बापट (देवगड ) चे किर्तन होणार आहे. २९ रोजी सकाळी ७.३० वाजता स्थलशुदी, देवता पूजन, अग्नीपुजन, ग्रहयज्ञ, पाठवाचन,दुपारी १.३० वाजता आरती, नैवेद्य, महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता प. पु. सद्गुरू नामदेव महाराज भक्त मंडळ ( सिंधुदुर्ग) यांचा हरीपाठ, ७ वाजता आरती व सामुदायिक नामजप, ७.३० वाजता राजू मुंडले (तेंडोली) चे किर्तन, ३० रोजी सकाळी ७.३० वाजता स्थापित देवता पूजन, अग्निपुजन, पाठवाचन, दहापाठ हवन, कुमारी पूजन, बलिदान, अभिषेक, आर्चायादी पूजन, श्रेयोदान, ग्रहविर्सजन, कुष्मांड बली, सांगता नैवेद्य, गाऱ्हाणे, दुपारी १ वाजता प. पू. सद्गुरू श्री शिवदत्तनाथ महाराज (गोवा) यांचे आगमन पूजन व दर्शन, १.३० वाजता आरती, नैवेद्य व महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता आरती व सामुदायिक नामजप, ७.३० वाजता ग्रामस्थांची भजने, रात्री ९ वाजता आई भगवती कला दिंडी ( तोरसोळे ता. देवगड) यांची दिंडी होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव सत्पुरूष, देवी भराडी देवस्थान कमिटी, उत्सव कमिटी, गोवेरी ग्रामस्थ सेवा मंडळ (मुंबई ) व ग्रामस्थांनी केले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.