सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डी. चव्हाण यांचे निधन

कायद्याचा गाढा अभ्यासक असलेले न्यायाधीश हरपल्याची भावना
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी व सह दिवाणी दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर एस. डी. चव्हाण (वय 48) यांचे शनिवारी रात्रीच्या सुमारास निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी त्यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व सह दिवाणी दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. मूळ लांजा वेरळ येथील असलेले श्री. चव्हाण हे कायद्याचे गाढे अभ्यासक व कायद्यावर पकड असलेले न्यायाधीश म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. त्यांची प्रॅक्टिस मूळ लांजा येतील ऍड. वाय आर पाटकर या ज्येष्ठ वकिलांकडून सुरुवात झाली. 2009 मध्ये त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर न्यायदान सेवेत आल्यावर काही काळाने त्यांची मालवण येथे दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांना बढती मिळाली. व या बढतीनंतर त्यांना अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी व सह दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर या पदावर नियुक्ती करण्यात आली. न्यायदान करताना पूर्वीच्या निवाड्यांचा संदर्भ चा त्यांचा गाढा अभ्यास होता. कायद्याची बारकाई त्यांना माहिती होती. जलद न्यायदाना साठी त्यांची ख्याती होती. त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. लांजा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त करण्यात आला आहे.
दिगंबर वालावलकर, कणकवली